About College

कला व वाणिज्य महाविद्यालय , इगतपुरी

उज्जवल परंपरा :

स्वातंत्र्यपुर्व काळात पुण्याच्या फग्युर्सन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नाशिक मधील काही तरुणांनी राष्ट्रीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १ मे १९१८ रोजी 'संहति: कार्यसाधिका ' हे ब्रीदवाक्य स्वीकारून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ , नाशिक, हि संस्था स्थापन केली. सध्याची जु. स. रुंगठा हायस्कुल हि या संस्थेची पहिली शाळा होय.

महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये १०० वर्षे पूर्ण केलेल्या संस्थांमध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळा  अंतर्गत , सहा बालमंदिर , सोळा माध्यमिक विद्यालये व तीन उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. दोन वरिष्ठ महाविद्यालये , दोन किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम , एक नाईट स्कुल , दोन आय. टी. आय. , एक संगीत महाविद्यालय , एक रात्र महाविद्यालय आहे. या व्यतिरिक्त मंडळाची शहरी , ग्रामीण , अतिग्रामीण व जनजाती अशा सर्व क्षेत्रात ज्ञानदानाची केंद्रे आहेत. 

Read More

Principal Message

प्राचार्यांचे मनोगत

इगतपुरी सारख्या आदिवासी भागात उच्च शिक्षणाचे बीज पेरणे हे महाविद्यालयाचे ध्येय असून, माझ्या मते केवळ पायाभूत सुविधा आणि भव्य इमारत मूलभूत शिक्षण तयार करीत नाहीत तर विध्यार्थ्यांना मानसिक पाठबळ देणेही गरजेचे असते. जागतिक स्तरावर हुशार व्यक्तिमत्व,  व्यावसायिक कौशल्य आणि प्रभावी मनुष्यबळ निर्माण करणे हे महाविद्यालयाचे उदिद्ष्ट असून आमचे प्राध्यापक पारंपरिक आणि आधुनिक शिक्षण पद्धतींचा आदर्श समोर ठेवत विध्यार्थ्यांना भविष्यात सक्षम नागरिक घडविण्याचे महत्वाचे कार्य पार पाडतात.

शिक्षण हे केवळ वैयक्तिक विकासासाठी नव्हे तर समाजाच्या आणि देशाच्या सर्वांगिण विकासासाठी मदत करते. समस्यातून मार्ग काढणे व निराकरण करणे समुपदेशन केंद्रामार्फत होत असते, विद्यार्थी  विकास करण्याच्या दृष्टीने सॉफ्ट स्किल प्रशिक्षण दिले जाते. तसेच विद्यापीठ स्तरावर विद्यार्थी विकास मंडळ, राष्टीय सेवा योजना, बहिःशाल शिक्षण मंडळ या समित्यांमार्फत कार्य पार पाडली जातात. महाविद्यालयात सर्व प्रकारच्या शैक्षणिक सोयीसुविधा उपलब्ध आहेत.

सामाजिक कर्तव्य म्हणून पर्यावरण जाणीव जागृती कोर्स राबविला जातो. वर्षाच्या शेवटी महाविद्यालयाच्या पदवीप्राप्त विद्यार्थ्यांचा पदवीग्रहण समारंभ होतो.

आमचे महाविद्यालय गेल्या सात वर्षांपासून शिक्षणाबरोबर उत्तम नागरीक घडविण्याचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. मला विश्वास वाटतो की, आमचे दूरदृष्टी व्यवस्थापन आणि समर्पित प्राध्यापक, कर्मचारी निश्चिचतपणे आपले उद्दिष्ट साध्य करतील.

 

हार्दिक शुभेच्छा !                                                                                                                   

 

प्र.प्रा. वामन नितीन गोरक्षनाथ

प्रभारी प्राचार्या,

 

Departments

View More

Photo Gallery

Copyright © NSPM Nashik. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.