About us

कला व वाणिज्य महाविद्यालय , इगतपुरी

उज्जवल परंपरा :

स्वातंत्र्यपुर्व काळात पुण्याच्या फग्युर्सन महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या नाशिक मधील काही तरुणांनी राष्ट्रतीय शिक्षण देण्याच्या उद्देशाने १ मे १९१८ रोजी 'संहति: कार्यसाधिका ' हे ब्रीदवाक्य स्वीकारून नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ , नाशिक हि संस्था स्थापन केली. सध्याची जु. स. रुंगठा हायस्कुल हि या संस्थेची पहिली शाळा होय.

महाराष्ट्रातील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांमध्ये १०० वर्षे पूर्ण केलेल्या संस्थांमध्ये नाशिक शिक्षण प्रसारक शाळा , सहा बालमंदिर , सोळा माध्यमिक विद्यालये व तीन उच्च माध्यमिक विद्यालये आहेत. दोन वरिष्ठ महाविद्यालये , दोन किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम , एक नाईट स्कुल , दोन आय. टी. आय. , एक संगीत महाविद्यालय, एक रात्र महाविद्यालय आहे. या व्यतिरिक्त मंडळाची शहरी , ग्रामीण , अतिग्रामीण व जनजाती अशा सर्व क्षेत्रात ज्ञानदानाची केंद्रे आहेत.

 

महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये :

 

1.     अध्ययन , शिस्त व संशोधन यास महत्व

2.     तज्ज्ञ मार्गदर्शकांची व्याख्याने

3.     कलागुणांना वाव देण्यासाठी अभ्यासांतर्गत व अभ्यासेतर विविध मंडळांचे गठण

4.     राष्ट्रीय खेळांची सोय , क्रीडांगण

5.     स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन  केंद्र

6.     विद्याथी विकास मंडळ

7.     भित्तिपत्रक योजना

8.     प्लेसमेंट सेल

9.     दृकश्राव्य माध्यमांचा अध्यापन वापर

10.विद्यार्थीनी प्रबोधिनी

11.समुपदेशन केंद्र

12.व्यक्तिमत्व विकास केंद्र  

 

 

महाविद्यालयाचे ध्येयवाक्य :

 

o   दर्जेदार शिक्षणातून विशेषतः मागास आणि गरजू विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करणे.

o   कल्पकता , व्यावसायिक दृष्टीकोन आणि माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगास प्रोत्साहन देणे.

o   नैतिक , बौद्धिक आणि शारीरिक क्षमतांसह विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुणांचा विकास करणे.

o   शिक्षण आणि संशोधनाद्वारे ,मानवी मूल्य आणि जाणिवांचा विकास करणे.

 

 

Copyright © NSPM Nashik. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.