प्रवेश माहिती

प्रवेश पात्रता :-

उच्च माध्यमिक परीक्षा (१२ वी) अथवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विध्यार्थाना प्रथम वर्ष कला / वाणिज्य शाखेत १२ वी परीक्षा ज्या शाखेत आहे त्याच शाखेत प्रवेश मिळेल.

 

प्रवेश पद्धती :-

अ )    प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने , विद्यापीठ पात्रता दाखल्यासाठी ठराविक नमुन्यातील अर्ज शुल्कासह कार्यालयात सादर केला पाहिजे.

ब )   पुणे विद्यापीठाच्या कक्षेतील अन्य महाविद्यालयातून या महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास स्थलांतर दाखला (Transfer Certificate) आणावा लागेल. अशा विद्यार्थ्यास प्रवेश घेतांनाच महाविद्यालयामार्फत स्थलांतराच्या दाखल्यासाठी विशिष्ट नमुन्यात अर्ज करावा लागले.

क )    पुणे विध्यापिठाखेरीज इतर विद्यापीठामधील महाविद्यालयातून आणि अन्य प्रांतातून प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थाना पात्रतेच्या दाखल्यासाठी (Eligibility Certificate) विशिष्ट नमुन्यातील अर्ज व विद्यापीठाने विहित केलेले शुल्क भरावे लागले. मूळ दाखल्यासोबत प्रत्येक दाखल्याच्या दोन छायांकित प्रती प्रवेश अर्जासोबत देणे आवश्यक आहे.

           

     अशा विद्यार्थ्यांना तात्पुरता प्रवेश दिला जाईल. सावित्रीबाई  फुले पुणे विद्यापीठाकडून पात्रता प्रमाणपत्र आल्यावरच प्रवेश कायम समजला जाईल.

ड )    सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मान्यता दिलेल्या डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागते. वैद्यकीय तपासणीचा दाखला असला तरच प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विध्यार्थाना गुणवत्ता क्रमवारीने प्रवेश दिला जाईल.

इ )    ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घ्यावयाचा आहे , त्याने प्रवेश अर्ज व्यवस्थित भरून शुल्कासह दिलेल्या तारखेच्या आत कार्यालयात सादर करावा. प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्याने खालील

कागदपत्रांच्या मुळ  प्रती व त्यांच्या  दोन प्रमाणित (Attested) प्रती जोडणे आवश्यक आहे.

  1. गुणपत्रक
  2. शाळा सोडल्याचा दाखला
  3. इतर आवश्यक ती प्रमाणपत्रे
  4. ज्या शुल्क सवलतीसाठी व शिष्यवृत्तीसाठी अर्ज करावयाचा असेल, त्याचा संपूर्ण भरलेला अर्ज

प्रवेश रद्द करणे बाबत

प्रवेश मिळाल्यानंतर प्रवेश रद्द करावयाचा असल्यास , प्रवेश शुल्काची रक्कम विद्यापीठाच्या नियमानुसार परत मिळेल. विद्यापीठाच्या नियमानुसार प्रवेश शुल्क कमी भरलेले असल्यास , उर्वरित रक्कम महाविद्यालयात जमा केल्यानंतरच प्रवेश रद्द होईल.

 

Copyright © NSPM Nashik. All Right Reserved. | Designed & Developed By : Xposure Techmedia Pvt. Ltd.